बीड : पोलिस अधिक्षक कॉवत यांच्या आदेशाप्रमाणे परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे छापा मारून १३ लाख ५० हजाराचा गुटखा पकडला.
पोलीस अधिक्षक कॉवत यांच्या आदेशाप्रमाणे धर्मापुरी येथे पोलीस अधिकारी व स्टाफसह स्वतः जाऊन इसम नामे सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांच्या दुकानात व अन्य ठिकाणी छापे मारून तपासणी केली असता महाराष्ट्र राज्यात वाहतुक, विक्री व सेवनास प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला ज्यामध्ये शॉट पान मसाला, विमल पान मसाला, नवरतन पान मसाला, व्ही वन तंबाखू, जाफरानी तंबाखू व इतर नावे असलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ अंदाजे किंमत १३,५०,०००/- असा मिळून आल्याने पोलीस ठाणे येथे आणून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. तसेच अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती भोसले मॅडम यांना संपर्क करून माहिती देण्यात आली असून त्यांच्या विभागास लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे फिर्याद व पंचनामा कार्यवाही करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे.