spot_img
16.2 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

नवनीत कॉवत बीडचे पोलिस अधिक्षक

बीड : मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी बीडच्या पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बदली संदर्भात आदेश दिले होते. त्यानंतर आज छत्रपती सभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून असलेले नवनीत कॉवत यांची बीडचे पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती आदेश काढले आहेत. एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत.
अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच आता शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे. कावत मुळचे राजस्थानचे असुन २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. त्यांनी यापुर्वी धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे तर सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते. एक शांत पण ठाम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

ताज्या बातम्या