spot_img
21 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

नाशिककरांसाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीचा पेरू झाला गोड

नाशिकच्या पेरू वाटप आंदोलनाची दखल
शेत तिथे रस्ता आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांचे तातडीचे परिपत्रक
शिव पानंद शेतरस्ते खुले होताच पेरू काय पेरूची पेटीसुद्धा स्वीकारेल- जिल्हाधिकारी जलज शर्मा
नाशिक | ज्ञानेश्‍वर काकड
कुटुंबाचे विभाजन होत असलेने शेतीचे देखील विभाजन होत आहे.त्यामुळे क्षेत्र कमी कमी होत असल्यामुळे शेतकर्‍यांचा कल शेतातून सुरू असलेली वहीवाट बंद करणे कडे आहे.त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते,हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करणे करिता मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत.आणि ज्या अर्थी सदर प्रकरणांमध्ये स्थळ निरीक्षण करणे,मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे व त्यामुळे सदर रस्ते खुले करण्यासाठी काही कालावधीची आवश्यकता आहे यासंदर्भातील परिस्थितीचा विचार करता शेतकरी वर्गाच्या रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण रस्त्यावरील अतिक्रमण काढणे करिता शासनाने काढलेल्या उक्त संदर्भ क्र.१ येथील शासन परिपत्रकामध्ये दर्शवलेले ग्रामीण भागातील गाडी मार्ग (पोटखराब) हे राज्यात भूमापनाचे काम पूर्ण करीत असताना सदर रस्त्यांचा तपशील व रुंदी १६.५ ते २१ फुटापर्यंत निश्चित केलेली असून त्याचा तपशील सदर भूमापन क्रमांकाच्या पोट खराब क्षेत्राचा विचार करताना प्रतिबुकात नमूद केलेला आहे आणि ज्या अर्थी पायमार्ग हे गावाच्या नकाशात तुटक रेषेने दर्शवलेले असून अशा पाय मार्गाची रुंदी ८.२५ फूट असलेले निश्चित आहे अशा पद्धतीचे विशेष कालावधीत तारखेनुसार टप्पे तयार करत विशेष मोहीम हाती घेत तालुका प्रशासनाला विहीत मुदतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना देत दि.१६ डिसेंबरला पेरू वाटप आंदोलन होताच १८ डिसेंबरला शिवपानंद शेतरस्ते खुले करण्याचे परिपत्रक काढून सन्माननीय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शेतकर्‍यांची मने जिंकल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील,प्रकाश होनराव,ज्ञानेश्वर काकड, समाधान टिळे,डॉ.धीरज होले,दीपक शिंदे,ज्ञानेश्वर घोटेकर,भाऊ तासकर,दत्तात्रय घोटेकर,विलास दौंड,वाल्मीक गायकवाड,गोरख मालसाने,सचिन शेळके,भाऊसाहेब वाळुंज, संजय साबळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.
पेरू वाटपआंदोलनाची दखल घेत दोनच दिवसात नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांकडून तातडीचे परिपत्रक
नाशिक जिल्हा व तालुका प्रशासनाला जिल्हाधिकारी यांच्या कडून विशेष सूचना सर्व तालुक्यामधील गटविकास अधिकारी यांचे मार्फत ग्रामपंचायत यांना आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे,पोलीस निरीक्षक यांना उपरोक्त नमूद केले बाबत निशुल्क पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देणे,उपअधिक्षक भूमीअभिलेख यांना सादर कामे कामे जुने नकाशे त्वरित उपलब्ध करून देणे बाबत सुचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

ताज्या बातम्या