बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबरोबरच खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीडच्या एलसीबीने ही कारवाई केली आहे.
केज- वाल्मिक कराड यांच्या सह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकार्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकार्यांचे
अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकार्यांनी केज पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे केज पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल असलेला सुदर्शन घुले या तिघाजणावर खंडणीचा व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यामुळे केज मध्ये पुन्हा अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणातील तिघा जणांना पकडले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबरोबरच खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात बीडच्या एलसीबीने ही कारवाई केली आहे.