spot_img
23.8 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

spot_img

गेवराई बायपासजवळ दोघांना उडविले ;एकाचा जागीच मृत्यू

बीड : गेवराई जवळ बायपास रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास स्कुटीवरून बीडच्या दिशेने येणार्‍या दोघांना उडविले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
गेवराई येथील बायपासजवळ स्कुटीवरून बीडच्या दिशेने येत असलेल्या दोघाांना ओव्हरटेक करणार्‍या ट्रकने जोराची धडक दिली. स्कुटीवरील चालकाला तोल सांभाळता न आल्याने पाठीमागील चाकाखाली स्कुटी आली. यामध्ये पाठीमागे बसलेल्या बाजूला पडला. तर गाडी चालविणार्‍याच्या डोक्यावर टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर मांसाचा सडा पडला होता. उपस्थित लोकांनी जखमीला रूग्णालयात घेऊन गेल्याचे समजते. यातील दोघांचीही नावे समजले नसून ओळख पटविण्याचे काम चालू आहे.

ताज्या बातम्या