spot_img
11 C
New York
Thursday, December 19, 2024

Buy now

spot_img

संतोेष देशमुख खून प्रकरणी विधान परिषदेत पडसाद

अंबादास दानवेंनी सभागृहात थेट वाल्मिक अण्णाचं नाव घेतलं!
नागपूर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणाचे पडसाद आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत, आरोपी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे असल्याचा आरोप केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्या प्रकरणात वॉचमनने एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत. आरोपी बाहेर फिरत आहेत. ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात. बाप तो बाप है म्हंटलं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक तालुका अध्यक्ष यात आहे. तीन गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. एक मंत्री आहेत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक अण्णा नावाची ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत.
एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला आहे. हे गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. पिआया सक्तीच्या रजेवर पाठवला आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. ते तपास करत आहेत. मंत्र्यांचे जवळचे बोलणं योग्य नाही. कारण संबंध नसताना मंत्र्यावर अंगुली निर्देश होत असतो. आम्ही -ख टेक्नॉलॉजी वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आरोपी कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल. ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. डखढ मार्फत चौकशी करुन, यामागे जो कोणी असेल त्यांना शोधून काढून कारवाई करु, असं आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

ताज्या बातम्या