spot_img
30 C
New York
Wednesday, July 30, 2025

Buy now

spot_img

आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात ;५ डॉक्टरांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते. त्यादरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते प्रवास करत असलेली स्कॉर्पियो भरधाव वेगाने दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे वर कन्नौजजवळील तिर्वा येथे हा अपघात झाला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हे डॉक्टर प्रवास करत असलेली भरधाव स्कॉर्पियो दुभाजकावर आदळून दुसर्‍या लेनमध्ये गेली आणि समोरून येणार्‍या ट्रकवर आदळली. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे. तसेच हे सर्वजण लखनौमधील एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सैफई येथे परतत होतो, अशीमाहिती समोर आली आहे.
दरम्यान, तिर्वा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सी.पी. पाल यांनी सांगितले की, रुग्णालयात सहा जणांना आणण्यात आले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर एखजण गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या