spot_img
16.2 C
New York
Friday, October 31, 2025

Buy now

spot_img

शिरूरमध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीची आत्महत्या

शिरूर कासार : तालुक्यातील खामकरवाडी येथील जिल्हापरिषदेच्या शिक्षकाचा आज (दि.२१) रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाल्याची घटना घडली. घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून पति पाठोपाठ मृत्युला कवटाळले.
अधिक माहिती अशी कि, कन्हैयालाल खामकर (वय ५२) रा. खामकरवाडी ता.शिरुरकासार हे तालुक्यातील आर्वी केंद्रांतर्गत असलेल्या शिंदे वस्ती जिल्हापरिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करीत होते. त्यांना गुरुवारी (दि.२१) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युचा शोक कुटुंब व्यक्त करीत असतानाच त्यांच्या पत्नी राहीबाई कन्हैयालाल खामकर (वय ४५ वर्ष) यांनी नैराश्यातून काही वेळातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सर्व शोक करत असताना याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. परंतु ज्यावेळी त्यांना पाहिले तेंव्हा त्यांचा मृत्यु झाला होता.या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या