spot_img
24.6 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

spot_img

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी स्वप्नील गलधर यांची नियुक्ती

एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करणार-स्वप्निल गलधर
बीड : शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी स्वप्नील गलधर यांची निवड केली. गलधर यांच्यावर आष्टी, पाटोदा विधानसभा व गेवराई विधानभेची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्या निवडीने पक्षाची ताकद जिल्ह्यात पुन्हा वाढणार असून शिवसैनिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे स्वप्निल गलधर यांनी सांगितले.
अपघातग्रस्तांना मदत करण्यापासून विविध सामाजिक कार्यात गलधर यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गलधर यांनी सतत आंदोलनही केले आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वप्नील गलधर यांनी मराठा आरक्षण आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. युवकांचे हृदय स्थान असलेले स्वर्गीय अमोल गलधर यांचे ते लहान बंधू आहेत त्यामुळे जिल्हाभरात युवकांची मोठी फळी त्यांच्यामागे असून जिल्हयाच्या राजकारणात गलधर यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी स्वप्नील गलधर यांची निवड केली असून त्यांच्यावर आष्टी, पाटोदा विधानसभा व गेवराई विधानभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर स्वप्नील गलधर यांनी पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे आभार मानले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यानुसार, पक्ष वाढीसाठी आपण कार्य करणार असल्याचे गलधर यांनी सांगितले. गलधर यांच्या निवडीने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर

ताज्या बातम्या