spot_img
4.5 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

spot_img

सांगलीत भाजप नेत्याची भररस्त्यात हत्या

सांगली  : विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत सांलीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर रोडवरील राम मंदिरजवळ त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. शेत जमिनीच्या वादातून कुर्‍हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सुधाकर खाडे यांच्यावर वार झाल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतील त्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

ताज्या बातम्या