spot_img
34.6 C
New York
Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये अंबिका चौकात पोलिसाला ट्रकने उडविले;जागीच मृत्यू

बीड । सिमेंट घेऊन जाणार्‍या ट्रकला ओव्हरटेक करताना पाठीमागील टायरच्या खाली आल्याने दुचाकीस्वार पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (दि.9) दुपारी 12 च्या सुमारास शहरातील अंबिका चौकात पांगरी रोडवर घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
सुनील सुंदरराव घोळवे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. आज दुपारी 12 च्या सुमारास ट्रक क्रमांक एम. एच. 44 यू. 9871 सिमेंट
घेऊन अंबिका चौकातून पांगरी रोड कडे चालला होता. यावेळी पोलीस कर्मचारी दुचाकी क्रमांक एम. एच. 44 ए ए 9076 वरून जात होते. यावेळी ट्रकला ओव्हरटेक करताना अचानक ते दुचाकीवरुन पडले अन् ते ट्रकच्या पाठीमागील चाका खाली आले. पोलीस कर्मचारी सुनील घोळवे यांचा जागीच मृत्यु झाला. घटना घडताच पोलीस उपाधीक्षक विश्‍वांभर गोल्डे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला. सदरील मयत पोलीस कर्मचारी गणवेशात असल्याने त्यांना कर्तव्यावर असताना मृत्यूने कवटाळले

ताज्या बातम्या