परळी : विधानसभा निवडणुकीत जसा जसा प्रचाराचा धडाका वाढत चालला तस शहरात गुन्हेगारी वर तोंड करताना दिसून येत असून यातच परळी शहरात ३ गावठी पोस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा युवकास परळी शहर पोलिसांनी जेरबंद केले. गावठी पिस्टल विरोधात पोलिसांनी यापूर्वी देखील अनेक कारवाया करत गुन्हे दाखल केले मात्र शहरात युवकांना हे पिस्टल मिळतात कसे? हा प्रश्न अद्याप ही अनुत्तरित आहे.
परळी शहरातील जुन्या परळी मधील गणेशपार भागात असलेल्या काळरात्री मंदिर पाठीमागे एक ३० वर्षीय युवक तीन गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे बाळगून असल्याच्या माहिती वरून शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ३ गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे आढळून आली ज्याची अंदाजे किंमत १ लाख ५६ हजार एवढी आहे.वैभव रोहीदास घोडके (वय ३० वर्ष रा. भिमनगर ) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे विष्णू सानप यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुरनं. १६४/२०२४ कलम ३,२५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.