बीड : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेकजण उतरले होते. त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी अनेकांनी माघार घेतली असून इतरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातून १५९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आष्टी विधानसभेत ३५ माघार तर १७ रिंगणात तर बीडमध्ये ५९ जणांनी माघार घेतली असून ३१ रिंगणात आहेत. गेवराईमध्ये २१ रिंगणात तर २५ जणांची माघार घेतली आहे. केजमध्ये २५ रिंगणात ११ची माघार तर माजलगावमध्ये ९८ पैकी ६४ ची माघार ३४ रिंगणात , परळी ४६ पैकी २५ माघार तर ११ रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून एकूण १५९ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.