बीड : परळी विधानसभेकडे राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले असताना उमेदवारी अर्ज दाखल 48 पैकी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे कोण कोणाचे मत खाणार हे 23 नोव्हेंबरला समजणार आहे. तर या ठिकाणी राजेभाऊ फड यांनी माघार घेतली आहे. तर केजमध्ये माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी माघार घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला खर्या अर्थाने उद्यापासून सुरूवात होणार आहे. सोमवार दि.4 नोव्हेंबर हा माघार घेण्याचा दिवस होता. यामध्ये परळी मतदारसंघातील 48 पैकी 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे यांच्यामध्ये आता खरी लढत होणार आहे.केज विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून शरद पवारांचे उमेदवार असलेल्या पृथ्वीराज साठे यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघात मुंदडा विरुद्ध साठे ही निवडणुक चूरशीची होणार हे स्पष्ट झाले.