spot_img
0.6 C
New York
Wednesday, December 10, 2025

Buy now

spot_img

जयदत्तअण्णा क्षीरसागरांची निवडणुकीतून माघार

बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र एकाच घरातील तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातील जयदत्तअण्णा यांनी माघार घेतल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
बीड विधानसभेच्या संदर्भाने मोठी बातमी हाती येत आहे. येथून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. बीड विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होतील.

ताज्या बातम्या