गेवराई : तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या टीमने हद्दीतील एका गांज्याची लागवड केलेल्या शेतात छापा मारून तब्बल 120 झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत जवळपास 21 लाखांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या पौळ्याची वाडी येथे कैलास शेषराव शेंडगे या शेतकर्याने 472 गट क्रमांकमध्ये गांज्याची लागवड केली असल्याची माहिती प्रभारी संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार चकलांबा पोलिसांनी छापा मारून आज सकाळी 21 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.