नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून , नांदगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे. समीर भुजबळ यांनी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या २८ तारखेला मी उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नांदगाव मतदारसंघामध्ये विकास खुंटला आहे. विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार आल्यानंतर मतदारसंघामध्ये दुरावस्था झाली असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे. नांदगाव मतदारसंघामध्ये अतिशय भयभीत वातावरण असल्याचे समीर भुजबळ म्हणाले. जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यामुळं दुसरा काहीतरी निर्णय घ्यावा असी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळं मी निवडणूक लढवण्याचा निर्णय गेतल्याचे समीर भुजबळ यावेळी म्हणाले.