पुणे : राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटना, त्यामध्ये बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर. एवढे सारे खळबळजनक चालू असताना पुण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणार्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित तरुणी शिक्षण घेते. तर आररोपी देखील याच महाविद्यालयात ११वी,१२वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून महाविद्यालयीन मुलीवर चाबलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. कोरेगाव पार्क पोलिसांकडून या प्रकरणी पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील दोन तरुण अल्पवयीन आहेत. पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच या उपक्रमातून ही घटना समोर आली आहे.
हा संपूर्ण प्रकार एप्रिल पासून घडत आला आहे. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोन वरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला. या संबधीचे व्हिडिओ देखील आरोपींनी काढल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत. पिडीत तरुणीला भेटण्यासाठी एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले, तर दुसर्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर २ तरुणांनी सुद्धा तिच्याशी अनेक ठिकाणी सबंध ठेवल्याची माहिती आहे. ही सर्व घटना पिडीत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पालकांनी पोलिसात धाव घेतली. तर या प्रकरणात ड्रग्जचा काही संबध आला नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.