spot_img
22.6 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img

अंबाजोगाईत रेल्वेने आलेला दिडशे किलो गांजा जप्त

अंबाजोगाई : रेल्वेने आलेला अंदाजे दिडशे किलो गांजा पोलिसांनी पकडल्याची प्राथमिक माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई ग्रामीण आणि परळी ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे संयुक्तरित्या केलीय.
दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, यांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, घाटनांदुर ते चोपनवाडी जाणारे रोडच्या बाजुला काही इसम विना परवाना बेकायदेशीररित्या गांजा सदृश पाला कब्जात बाळगुन बसले आहेत. त्यावरुन त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी पथक नेमुन छापा टाकण्यासाठी पथक रवाना केले. नमुद पथकाने बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता पाच इसम सहा पिशव्या कब्जात बाळगतांना दिसले. छापा पथकास पाहुन नमुद पाच पैकी 2 इसम पळुन गेले तर छापा पथकाने 3 संशयीत नामे 1) अनिल कांताराम जाधव वय-22 वर्षे, रा. पोखरी रोड, राधानगरी, अंबाजोगई उर्फ शेख सोहेल शेख खलील वय-22 वर्षे, रा. सातोना, ता. परतुर जि. जालना, 2) प्रतिक भेटु मंडल वय-19 वर्षे, रा. गरशामा जि. मुर्शीदाबाद पश्‍चिम बंगाल, 3) आजयमाल रपनमाल वय-26 वर्षे, गोकुलता पोस्ट खेरुर जि. मुर्शीदाबाद पश्‍चिम बंगाल यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 120 किलो 83 ग्रॅम वजनाचा एकुण 12,77,900/- रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सपोनि महेंद्रसिंग ठाकुर यांच्या फिर्यादीवरुन एकुण सहा आरोपींविरुद्ध अंबाजोगई ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं. 280/2024 कलम 20 (बी) गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींचा शोध अंबाजोगई ग्रामीण पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्या