spot_img
26.1 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img

वडीगोद्रीजवळ अपघात पाच ठार;१४ जखमी

जालना : जालना येथील वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ आज (शुक्रवार) बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला १४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेवराईकडून अंबडकडे जाणार्‍या बसने आयशर ट्रकला धडक दिली आणि भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.
जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरुन येणार्‍या आयशर ट्रकची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या