बीड : गेल्या अनेक दिवसांपासून मंडळाधिकारी सचिन सानप यांच्याबद्दल अनेकांनी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही अशी बोंब ठोकली होती. मात्र पाहिजे तेवढी पैशाची मागणी करायची आणि पैसे नाही दिले तर काम लांबवायचे असे धोरण या मंडळाधिकारी सानप याचे होते. मात्र अखेर करनीचे फळ त्याला मिळाल्याचे दिसत आहे. सानप याला जरी पकडले असले तरी त्याच्यासोबत असलेले दलाल मात्र सुटता कामा नये. दलालच सानप याच्याकडे पैसे पोहचवत होते. आज सानपला पकडले ते तब्बल एक लाख रूपयांची लाच घेताना पकडले आहे.
गेल्या आठवड्यात काही वाहनावर पोलीस व महसूल यांनी कारवाई केली होती, ती वाहने सोडवण्यासाठी बीड येथील मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी वाहनधारकाकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली होती त्यावर तडजोडीमध्ये एक लाख रुपये देण्याचे ठरले. वानधारकांना हे मान्य नसल्याने,वाहन धरकाने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे याची तक्रार केली . आज दिनांक २१ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास नगर रोडवर तहसील कार्यालयाच्या समोरील हॉटेलमध्ये बीड येथील लाच लोक प्रतिबंधक कार्यालय चे शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एक लाखाची लाख स्वीकारताना सचिन सानप यांना रंगेहात पकडले आहे. सानप याला पकडले असले तरी त्याच्या आजूबाजूचे बगलबच्चे पकडणे गरजेचे आहे. नवीन वसाहतीचा फेर ओढण्यासाठी त्याने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्याला त्याच्या करनीचे फळ मिळाल्याची चर्चा होत आहे.