spot_img
25 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये निखिल काळेची व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस ठेवून आत्महत्या

बीड : येथील निखील काळे या तरूणाने व्हॉटस्अ‍ॅपला स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी जेंव्हा निखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे घरच्यांनी पाहीले तेंव्हा सर्वजण हादरून गेले.
बार्शी नाक्यावरील तरूण निखील दत्तात्रय काळे या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी रात्री अकरा वाजता व्हाट्सअपला enjoy every moment everyday is last day in life, enjoy this moment any expected  असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून गळफास घेऊन जीवन संपवले.एक वर्षापूर्वीच या तरुणाच्या वडिलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वडिलांचे निधन झाले होते,तेव्हापासून निखिल ने घरची सर्व जबाबदारी घेऊन योग्यरित्या पार पाडत होता,त्यामुळे घरातीलच कर्त्या तरुणाने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त करत असून,आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.आपल्या जवळचा मित्र अचानक सोडून गेल्याने मित्रपरिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या