spot_img
21 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

spot_img

वडवणीत ज्ञानराधा मल्टीस्टेच्या खातेदाराचा हृदयविकाराने मृत्यू

वडवणी : जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य, व्यापारी यांचे ज्ञानराधाच्या विविध शाखेत पैसे अडकलेले आहेत. अनेकांचे संसार त्या पैशावर चालत होते. मात्र बँक बंद पडली आणि पैसेही मिळेना झाले. त्यामुळे अनेकांनी बँकेत खेटे मारले. पण आज उद्या मिळतील या आशेने आतापर्यंत अनेकांनी दिवस काढले. परंतु मिळत नसल्याने वडवणी येथील एका खातेदाराला हृदयविकाराचा झटका आला. बायपास करण्यासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानराधामध्ये असलेले त्यांचे पैसे त्यांना मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रीया व्यक्त होऊ लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथील भगवान दत्तात्रय बारटक्के यांचे ज्ञानराधा मल्टीस्टेट वडवणी शाखेत 7 लाख रुपये अडकलेले आहेत. ज्ञानराधा बंद पडल्याने ही रक्कम परत मिळणार की, नाही. ते या चिंतेत होते. या दरम्यान त्यांना ह्दयरोगाची लागन झाली. जास्त त्रास होत असल्याने दावाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. परंतु जवळचा सर्व पैसा ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये अडकल्याने हातात फुटकी कवडी नव्हती तर अनेकांकडे पैशांची मागणी केली परंतु पैशांची तजवीज होईपयरत खुप उशीर झाला अन् भगवान बारटक्के यांची उपचाराअभावी प्राणज्योत मालवली. यामुळे ज्ञानराधाने पहिला बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्ये केली जात आहे. तर प्रशासनाने वेळकाढूपणा केला तर आणखी अशा घटना वाढतील त्यामुळे यंत्रणा हलवून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या