spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

रोटरी क्लब ऑफ बीडच्या आरोग्य शिबीरात अडीचशे रुग्णांची तपासणी

बीड  : रोटरी क्लब ऑफ बीड व मातोश्री हॉस्पिटल बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत ईसीजी टू डी इको बीएसएल शुगर तपासणी शिबिर मातोश्री हॉस्पिटल तुळजाई चौक बीड येथे झाले. या शिबिरात एकूण २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५८ रुग्णांचा टु डी इको करण्यात आला. प्रोजेक्ट चेअरमन डॉ.अमोल जोगदंड व डॉ. सौ.मीनल जोगदंड -पिंगळे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या व कर्मचार्यांच्या सहकार्यातून हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यात आला.
प्रोजेक्टचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.मेघराज पिंगळे, सचिव संदीप खोड, क्लब ट्रेनर कल्याण कुलकर्णी, पीडीजी हरीश मोटवानी, पीपी वाय.जनार्दन राव यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. डॉ.मेघराज पिंगळे यांनी करत रोटरीच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. रो.डॉ.अमोल जोगदंड यांनी मेडिकल कॅम्प विषयी संपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली. या कार्यक्रमांमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक इत्यादी उपस्थित होते.
रो.डॉ.बालाजी नवले, विवेक बडगे, ओमप्रकाश लोहिया, संतोष पवार, राजेंद्र मुनोत, प्रमोद करमाळकर, कृष्णा खांडे, सुरज लाहोटी, सुमित जैस्वाल, संदेश लोळगे, सुकेश राव, सुहास बेदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण कुलकर्णी यांनी तर सचिव संदीप खोड यांनी आभार प्रदर्शन केले.
आवश्यक असलेल्या रुग्णांचा टु डी इको
शिबीरात अडीचशे रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांनी केली. यावेळी ५८ रुग्णांची टु डी इको तपासणी करणे गरजेचे होते. त्यानुसार ही तपासणी करण्यात आली.

ताज्या बातम्या