बीड : जिल्ह्यातील वाळू माफियांनी उच्छाद मांडलेला आहे. सध्या नवीन पोलिस अधिक्षक बारगळ यांनी पदभार स्विकारला आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात छापासत्र सुरू झाले असून पहाटे २ च्या सुमारास शहागड पुलाजवळ पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांना पाहताच वाळू माफियांनी त्याठिकाणाहून धुम ठोकली . यावेळी पोलिसांच्या हाताला चार मोटारसायकल आणि १ स्कॉर्पिओ गाडी लागली आहे.
बीड जिल्हयात वाळूची तस्करी जोरात आहे. माफियांचा राज असलेल्या गोदापात्रात दिवस-रात्र माफिया तळ ठोकून असतात.त्यामुळे वाळूची होणारी अवैध वाहतूक तातडीने थांबायला हवी,आणि अश्या माफियांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप त्यांच्यावर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जवाबदारी देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मागच्या दोन दिवसापासून गोदापात्रात कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. पहाटे २ वाजता शहगडच्या पुलाजवळ छाप्पा मारून पोलिसांनी चार मोटारसायकल व १ स्कर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे. सुभाष सानप व त्यांच्या टीमने केलेल्या या कारवाईमुळे सध्या गोदापात्रात खळबळ उडाली आहे.