सोलापूर : मराठा यौद्धा मनोज जरांगे सध्या सोलापूर दौर्यावर आहेत. त्यांनी सुरू केलेल्या दौर्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे. जो कोणी छगन भुजबळांना प्रचाराला घेऊन जाईल त्याला पाडा असा फतवाच मनोज जरांगे पाटीलांनी काढला आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आता कसे प्रत्युतर भेटते हे पहावे लागणार आहे. शांतता रॅलीमध्ये बोलताना मराठ्यांचे वाटोळे करणार्यांना आता सुटी देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
सोलापूरातील शांतता रॅलीमध्ये बोलताना मराठ्यांचे वाटोळे करणार्यांना आता सुटी देणार नाही. छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या पक्षाचा कार्यक्रम लावायचा. देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन माढा तालुक्यातील कार्यक्रमाला आले होते. यापुढील काळात घेऊन फिरले तर त्या मतदारसंघातील उमेदवारही पाडा, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (चरपेक्ष गरीरपसश) यांनी केलं आहे.
राज्यातीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (चरपेक्ष गरीरपसश) यांनी शांतता रॅली बुधवारी सोलापूर शहरात होती. काल बुधवारी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या पोरां-बाळांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असं ठरवले आहे. कारण, त्यांची पत्रकं चिटकवायला, प्रचार करायला मराठ्यांची पोरं पाहिजेत. हे सरकार आरक्षण देण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. ते फक्त लावालाव्या करताना दिसत आहे. माझ्याविरुद्ध अनेक जणांना उठवून बसवले आहे. मराठ्यांचे समन्वयक फोडायला सुरुवात झाली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
आम्ही याआधी तुम्हाला काही मागितलं आहे, माझ्या समाजाला आरक्षण मिळावं इतकंच आहे. आमच्या लेकरांच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, गेल्या एका वर्षापासून आम्ही लढतोय. आम्ही तुम्हाला काही म्हणालो नाही, मात्र तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं, पण इतकं लक्षात ठेवा यांना मराठे म्हणातात, यांच्या नादी लागला तर तुमचा राजकीय सुफडा साफ होईल असंही मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं आहे.