spot_img
28.7 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

spot_img

मध्यरात्री बीडमध्ये चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला

बीड : शहरात मागच्या काही दिवसापासून चोरीच्या घटनेते प्रचंड वाढ झाली आहे.रात्री १२. ३० च्या सुमारास खजना बावडीजवळ पकडायला गेलेल्या संशयितांनी पोलीस कर्मचारी व इतर दोघांवर दगडफेक केली आहे. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाली नसून चोरटे टाटा सुमो कार घटनास्थळी सोडून मात्र पसार झाले आहेत.
बीड शहरात मागच्या दोन महिन्यापासून चोरीचा घटनेत प्रचंड वाढ झाली आहे.या वाढणार्‍या चोरीच्या घटनावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग सुरु केली. रात्री १२. ३० च्या सुमारास पोलीस कर्मचारी संघर्ष गोरे, पोलीस कर्मचारी सचिन जायभाये,शमो शेख व अकिब खान घराकडे येतं असताना पेंडगाव जवळ त्यांना एका टाटासुमो कारमध्ये चार ते पाच जण संशयित म्हणून आढळून आले. यावेळी कारमध्ये असणार्‍या संशयिताकडे चोरीच्या मालाचा संशय आल्याने पोलिसांनी या कारचा पाठलाग सुरु केला. यावेळी टाटा सुमो कार मेहबूब नर्सरीजवळ (खजाना बावडी) सोडून चोरटे पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून पसार झाले. यावेळी गाडीत टपरीतील तांबूक, गुटखा, बिस्किट पुड्यासह काही सामान आढळून आले आहे.हिरापूर ते पेंडगाव दरम्यान असणार्‍या टपरीतील सामानाची चोरी करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसातून वर्तविला जात आहे.

ताज्या बातम्या