spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

नवीन गाडीचा हप्ता भरायला निघालेल्या तरूणाचा परळीच्या घाटात मृत्यू

अंबाजोगाई – मागील महिन्यात नवीन घेतलेल्या पल्सर गाडीचा हप्त भरण्यासाठी परळीला निघालेले निलेश नेमीचंद महाजन् (रा. जैन गल्ली, अंबाजोगाई) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात परळीच्या घाटात मंगळवारी झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश महान (वय ४०) यांनी मागील महिन्यात परळी येथून नवीकोरी पल्सर दुचाकी घेतली होती. या दुचाकीचा पहिला हप्ता भरण्यासाठी ते एकटेच मंगळवारी दुपारी परळीला निघाले होते. ते घाटात आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी घसरून रोडच्या बाजूला गेली. या अपघातात निलेश यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत निलेश महाजन यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंबाजोगाई येथील बोरुळा तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. निलेश यांच्या अकाली मृत्यूने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या