spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

अडीच लाखाची लाच घेताना सायबर सेलचा पोलिस कर्मचारी पकडला

बीड  : गोठवलेले बँक खाते पुर्ववत करण्यासाठी अडीच लाख रुपयांची रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन मिळवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिस कर्मचार्‍यास पकडण्यात आले.
बीडच्या सायबर पोलिस ठाण्यातील आशिष वडमारे याने तक्रारदाराकडून बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी केल्या होत्या. त्याचे बील देखील आरोपीने अदा केले होते. परंतु यानंतर तक्रारदाराचे पंजाब नॅशनल बँकेतील खाते सायबर पोलिस ठाण्याकडून गोठवण्यात आले होते. सदर बँक खाते पुर्ववत करण्यासाठी वडमारे यांनी पंचासमक्षक 3 लाख 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 2 लाख 50 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहत्रे यांनी केली.

ताज्या बातम्या