spot_img
30.3 C
New York
Tuesday, July 15, 2025

Buy now

spot_img

सावकाराने मोटारसायकल ओढून नेली ; केजमध्ये युवकाची आत्महत्या

केज : हात उसणे दिलेल्या थकित रकमेपोटी मोटारसायकल ओढून नेल्यामुळे सुकळी (ता. केज) येथे युवकाने गळफास घेत जीवन संपवले. मृताचे नाव अमोल विलास काटकर वय (३५ वर्ष) असे आहे. तो ट्रक ड्रायव्हरचे काम करत होता. शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेवून त्याने जीवन संपवले. इशशव उीळाश
शुक्रवारी (२६ जुलै) सकाळी सुमारे ७:३० वाजात अमोल यांनी गावाशेजारीच्या कुरण नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. अमोल यांच्या पँटच्या खिशात एक मोबाईल मिळून आला. त्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एका वहीच्या पानावर हाताने लिहिलेली एक चिठ्ठी मिळाली. इशशव उीळाश
या चिठ्ठीत गणेश धर्मराज मुंढे (रा. पहाडी पारगाव ता. धारूर) आणि त्याचा साथीदार रमेश देवराव थोरात रा. सुकळी (ता. केज) या दोघांनी आपली हिरो पॅशन प्रो (एम एच-२४/ए ए-८५८७) ही मोटरसायकल ओढून नेल्याचा उल्लेख केला आहे. या मानसिक तणावातून जीवन संपवत असल्याचे त्याने या चिठ्ठीत म्हटले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे हे तपास करीत आहेत. शेंडगे म्हणाले, मुंढे हे ऊसतोड मुकादम आहेत, आणि त्यांचे पैसे अमोल यांच्याकडे होते. त्यातून अमोल यांची मोटरसायकल ओढून नेली होते, असे दिसून येते. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. अमोल याचे बंधू विनोद काटकर यांनी याला दुजोरा दिलेला आहेत. विनोद यांनी या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे.
अमोल यांनी चिठ्ठीत मुंढे आणि थोरात यांना जबाबदार धरले आहे, त्यामुळे या दोघांना अटक करावी अशी मागणी अमोल याच्या नातेवाईकांनी केली आहे.

ताज्या बातम्या