spot_img
31.1 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

spot_img

श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती निमित्त जि.प.शाळा, महाविद्यालयांनी फेरी काढावी-गोसावी

नाशिक | ज्ञानेश्‍वर काकड
भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त जनजागृती म्हणून जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालय गावांतर्गत प्रभात फेरी करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे या विषयाचे निवेदन श्रीमती रक्षा निखिल खडसे( युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री) यांना श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी (भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष) यांनी दिनांक २१/७/२०२४ रोजी दिले याच निवेदनाची प्रत डॉ. भारती पवार (मा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री) चित्रा वाघ (भाजप नेत्या) यांनाही देण्यात आली
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये साजरी होणार आहे याचेच अवचित साधून आपल्या देशात व राज्यात प्रथमच महाराष्ट्र शासनामार्फत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा होणार असून तसेच श्री क्षेत्र जाळीचादेव येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर असून या ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंदिर असून या ठिकाणी राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भाविक भक्त लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येतात तसेच महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असल्यामुळे देशातून व राज्यातून स्वामींच्या अवतार दिनानिमित्त जाळीचा देव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यामुळे सर्व भाविक भक्तांची व जाळीचादेव मंदिराचे पुजारी मंडळी तसेच संत महंत वासनिक उपदेशी बांधव तपस्विनी तसेच राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यांची मागणी अशी आहे की सदर कार्यक्रमासाठी गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी स्वामींच्या मंदिरामध्ये पूजा विधी चा कार्यक्रम मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य )मा.श्री. अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र )तसेच केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यातील मंत्री यांच्या उपस्थित पार पाडावा ही भक्त जणांची इच्छा व मागणी आहे तसेच दरवर्षी माघ शु.१५ माघ पौर्णिमेला जाळीचादेव या ठिकाणी खूप भव्य दिव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो सदर यात्रेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात यामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यांमधून दिंड्या (पदयात्रा) येत असतात दिंड्यांची संख्या अंदाजे १०० इतकी असू शकते या दिंड्यांचा प्रवास अंदाजे ४०० ते ५०० किलोमीटर इतका असतो प्रत्येक दिंडीमध्ये ५०० ते ६०० महानुभाव पंथीय भाविक पायी देवाला येत असतात यामध्ये महिलांची संख्या जास्त असते आषाढी एकादशी निमित्त नोंदणीकृत दिंड्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने २० हजार रुपयांच्या अनुदान दिले आहे व यामध्ये वारकर्‍यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयास पाच लाखांचा विमा देण्यात आला तसेच अपंगत्व झाल्यास ५० हजार रुपये व वारी दरम्यान आजारी पडल्यास औषधांसाठी ३५ हजार शासनामार्फत देण्यात आले होते वरील प्रमाणे महानुभाव पंथीय यात्रेनिमित्त आलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना असाच लाभ देण्यात यावा ही विनंती तसेच भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त जनजागृती म्हणून जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालय गावांतर्गत प्रभात फेरी करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे या विषयाचे निवेदन श्रीमती रक्षा निखिल खडसे( युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री) यांना श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी (भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका उपाध्यक्ष) यांनी दिनांक २१/७/२०२४ रोजी दिले याच निवेदनाची प्रत डॉ. भारती पवार (मा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री) चित्रा वाघ (भाजप नेत्या) यांनाही देण्यात आली.

ताज्या बातम्या