spot_img
5.8 C
New York
Wednesday, December 24, 2025

Buy now

spot_img

शेकडो मुस्लिम युवकांचा माजी मंत्री क्षीरसागर गटात जाहीर प्रवेश

बीड  : आगामी काळात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे नेतृत्व सर्वमान्य असून त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याची तयारी दाखवत शेकडो युवक सामील होऊ लागले आहेत. मंगळवार दि.24 रोजी अजिजपुरा भागातील शेकडो युवकांनी जाहीर प्रवेश केला आहे.
माजी नगरसेवक मुखीद लाला यांच्या पुढाकाराने आजीजपुरा भागातील शेख रईस, शेख अजहर, जहागीरदार शाकेर, समीर इनामदार, शेख शाहेद, नसिर कुरेशी, शेख अनीस यांनी शेकडो युवकांसह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेतली. यावेळी हिवरापहाडीचे माजी सरपंच शेख नसीर हे ही उपस्थित होते. बीड शहरात आणि ग्रामीण भागात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील भविष्य लक्षात घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुन्हा एकदा हात बळकट करण्यासाठी शेकडो तरुणांचा प्रवेश होऊ लागला आहे. उपस्थित प्रमुख तरुणांसह कार्यकर्त्यांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्वागत केले.यावेळी शेख शोयब, शेख कामरान, शेख तरबेज, फिरोज इनामदार, शेख अकबर, शेख निहाल, शेख अरबाज, शेख इलियास, शेख उमर, शेख अनारस, पठाण आरेफ आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या