spot_img
0.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img

बीडचा इंद्रजित महिंद्रकर ढाकामध्ये अडकला

भारतात आणण्यासाठी ना.धनंजय मुंडेंची केंद्र सरकारला विनंती
बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा तरुण बांगलादेशच्या ढाकामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला होता. मात्र तिथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे इंद्रजित ढाकामध्ये अडकून पडलेला असून त्याच्याशी संपर्क होत नाहीये. अशातच आजारामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे इंद्रजितला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनंती केली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. बीडच्या अंबाजोगाई जिल्ह्यातील इंद्रजित रवींद्र महिंद्रकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ अकादमी ढाका आयोजित बुद्धिबळ स्पर्धेसाठी बांगलादेश येथे गेला आहे. तो सध्या ढाका शहरातील हॉटेल पॅसिफिकमध्ये अडकला आहे आणि त्याला अचानक अपेंडिसाइटिसचा गंभीर आजार झाला आहे. पुढील ७२ तासांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. परंतु सध्या त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. त्याला तात्काळ भारतात परत आणण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया सरकारने हस्तक्षेप करावा, असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ताज्या बातम्या