spot_img
1 C
New York
Thursday, February 26, 2026

Buy now

spot_img

” NMMS ” परीक्षेमध्ये शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे हायस्कूल बीडचे यश 

 बीड : शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे हायस्कूल बीड मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना,{NMMS} परीक्षेत विद्यालयास भरघोस यश संपादन केले या परीक्षा मधील उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे 1}चि.धस यसराज दीपक  2}चि.नागरगोजे सुमित अभिमान  3} चि.रहाटे कार्तिक दत्तात्रय  4} चि.घाटूळ करण केशव
शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून कौतुक करण्यात आले. या .कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. मुरूमकर एस.डी. हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. घाडगे माधव सर {संचालक नवोदय क्लासेस बीड} श्री. शिंदे ज्ञानेश्वर सर होते. प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.
शाळेचे  ज्येष्ठ लिपिक श्री. नवले सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. मुंडे ए. एच., श्रीम.आव्हाड एस. बी. {NMMS विभाग } श्री. मोराळे एस. एस. हे सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयामार्फत हार्दिक अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
एकूण बसलेले विद्यार्थी = 8 त्यापैकी पात्र झालेले विद्यार्थी = 4 एकूण शाळेचा निकाल 50 % लागला आहे. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन श्रीम. मुंडे जे.एस. , प्रास्ताविक श्री.तांदळे वाय.बी. , आभार प्रदर्शन श्री. कुवर व्ही.एम.  यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर यांचे फार मोठ्या प्रमाणात योगदान लाभले. कार्यक्रम खूप खूप छान झाला.

ताज्या बातम्या