spot_img
1 C
New York
Thursday, February 26, 2026

Buy now

spot_img

एनएमएस परिक्षेत अशोक माध्यमिक विद्यालयाचे यश

वडवणी | प्रतिनिधी
एन एम एम एस चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, चिंचाळा येथील अशोक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचाळा येथील इयत्ता आठवी ब या वर्गातील विद्यार्थिनींनी एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये साक्षी संदीप कांबळे , सानिका विक्रम वगरे , ज्ञानेश्वरी रामप्रसाद शिंदे या विद्यार्थिनींनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाले.
शाळेची गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचे वाचन वाढावे आणि ज्ञानाचा विस्तार व्हावा यासाठी शिक्षक वृंद मेहनत घेत आहेत. पुढील काळातही शाळेतून अनेक यशस्वी विद्यार्थी घडतील, असा विश्वास मुख्याध्यापक /प्राचार्य श्री.सावंत सर यांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात शैक्षणिक प्रेरणा निर्माण झाली असून, भविष्यातही यशाची ही परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे सर, ऍड.आनंदभैय्या काळे तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या