जोपर्यंत शेवटच्या भावाला दर्जेदार शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही- शरद पवळे
ज्ञानेश्वर काकड | नाशिक
शेतकर्यांना शेतीसाठी रस्ते मिळावेत यासाठी स्वतःच्या शेत रस्त्यापासून सुरु केलेला न्यायालयीन संघर्ष, ते शिवपानंद शेत रस्ते चळवळ सुरु करणारे शरद पवळे यांनी आत्तापर्यंत अनेक आंदोलने केलीत. याच अनुषंगाने मुंबई विधान भवन व मंत्रालय येथे, अधिवेशन सुरु असताना सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु मुंबई पोलिसांनी यास मज्जाव केला.
शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विधान भवनावरील शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या आंदोलनाला रोखल्यामुळे सरकारसोबत चर्चा सुरु ठेवण्यासाठी राज्यातील शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी शासन व प्रशासनास इशारा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत शांताराम पानमंद, सुरेश भुजबळ, विजय शेलार, अशोक जाधव, सोमनाथ कुंभार्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

