spot_img
4.4 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

spot_img

सरस्वती पांचाळ यांचे निधन

परभणी : जिल्ह्यातील उखळद येथील बाळासाहेब पांचाळ यांच्या मातोश्री सरस्वती विश्‍वनाथराव पांचाळ यांचे गुरूवार दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३.१० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीने काही दिवस साथ दिली . त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत असताना बुधवार दि.७ जानेवारी रोजी परभणी येथे पुन्हा तब्येत बिघडल्यामुळे दाखल करण्यात आले. मात्र गुरूवार दिनांक ८ जानेवारी रोजी पहाटे सरस्वती विश्वनाथराव पांचाळ प्राणज्योत मालवली . सरस्वती पांचाळ या बाळासाहेब पांचाळ यांच्या मातोश्री होत्या. सरस्वती पांचाळ यांच्यावर गुरूवार दिनांक ८ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उखळद येथे अंतिम संस्कार पार पडणार आहेत. सरस्वती पांचाळ यांच्या आत्म्यास परमात्मा शांती प्राप्त करो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना .
पांचाळ परिवाराच्या दु:खात धैर्यशिल परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्या