बीड : गेवराई तालुक्यात येत असलेल्या धोंडराई या ठिकाणी परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे. तरी सर्व साधक ताई दादांनी या परमचैतन्य सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन बीड जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धोंड्राई येथे शनिवार व रविवार, दिनांक १० जानेवारी २०२६ ते ११ जानेवारी २०२६ रोजी भव्य प्रचार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या निमित रविवार सायंकाळी ठीक ४ वाजता बैलगाडीमधून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमपुर्वीत आत्मसाक्षात्कार सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील सर्व सहजयोगी बंधू-भगिनींना आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले आहे. सर्व सहजयोगींनी या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन बीड जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
९४२२४९८२१०

