
कोमल पाटोळे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
वडवणी : तालुक्यातील देवडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार श्री राणुबाई देवीचा यात्रा उत्सव शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून या निमित्त नुतन वर्षानिमित्त येणार्या भाविकांसाठी कोमल करण पाटोळे मेंढापूरकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी पंचक्रोशीसह सर्व भाविक भक्तांनी या यात्रेचे तसेच रविवार दिनांक ४ जानेवारी रोजी होणार्या कुस्त्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन सरपंच अतुल झाटे यांनी केले आहे.

वडवणी पासून उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर साडेचार हजार लोकसंख्या असलेले देवडी एक सदन गाव आहे.या ठिकाणी पूर्वीपासूनच नवसाला पावणारी रानुबाई देवी म्हणून प्रसिद्ध आहे.या ठिकाणी मोठे देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील हजारो भावी भक्तांच्या आराध्य दैवत राणूबाई देवी कडे भाविक भक्त नवस बोलतात व ही देवी भाविक भक्तांचे नवसही पूर्ण करते आणि ते देवीचे नवस फेडण्यासाठी गेली नऊ दिवस झाले अंगाला हळद लावून हे भाविक भक्त कोणालाही स्पर्श न करता देवीच्या दरबारामध्ये नऊ दिवस पूजा आराधना करत असतात.या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण गावातील देवी भक्त उपवास करत असतात.या नऊ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध आराधी मंडळ,भारुड,गवळणी आधी भरगच्च कार्यक्रमांची गावकर्यांना मनोरंजन पर मेजवानी असते.देवडी गावातील व पंचक्रोशीतील माहेर वासिनी लेकी बाळी आपल्या लाडक्या रानुबाई देवीची खना नारळाची ओटी भरण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पौष पोर्णीमेला हजेरी लावत असतात.नवस करणारे देवीभक्त आठ दिवस अंगाला हळद लावून पूजाआराधना करून नवव्या दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेला गुलालाची व लेवड्यांची उधळण करत देवीचा गजर करत या यात्रा उत्सवामध्ये १२ बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडतो. आणि त्यानंतर दुसर्या दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कुस्त्यासाठी राज्यासह जिल्हाभरातील पहेलवान हजेरी लावतात. उत्साह पूर्ण असलेल्या यात्रेसाठी पंचक्रोशीसह राज्यभरातून भाविक भक्त हजेरी लावतात. यात्रेत वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली जातात . यावर्षी हा उत्सव शनिवार ३ जानेवारी रोजी होणार आहे. गावचे सरपंच अतुल झाटे यांनी या यात्रेमध्ये भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत . या निमित्त भाविक भक्त तसेच नवीन वर्षाच्या निमित्त कोमल करण पाटोळे मेंढापूरकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे . त्यामुळे भाविक भक्तांनी या सांस्कृतिक कार्यक्रमासह यात्रेत सहभागी होऊन आनंद लुटावा असे आवाहन अतुल झाटे यांनी केले आहे.

