वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी रामराजे कुटुंबाचा अनोखा उपक्रम
नाशिक | ज्ञानेश्वर काकड
मरावे परी वृक्ष रुपी उरावे या उक्तीप्रमाणे सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील रामराजे कुटुंबाने आपल्या मृत्यू झालेल्या वडिलांच्या नावाने वृक्ष रोपण करून स्मृती जपण्याची अनोखी परंपरा सुरू करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. वृक्ष संवर्धनश्र बरोबर नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे नायगाव खोर्यात कौतुक होत आहे.
नद्यांचे पावित्य राखण्यासाठी व नदीचे पाणी दूषित होण्यापासून वाचविण्यासाठी सामाजिक संस्था शासन कडून वेळोवेळी जनतेला आवाहन केले जाते. त्याच अनुषंगाने ब्राह्मणवाडे गावचे पोलीस पाटील कमलाकर रामराजे यांनी ह्यांचे बंधू कलकतीथ गोविंद मधुकर रामराजे यांचे गुरुवारी निधन झाले.या कुटुंबाने आपल्या मुलाच्या अस्थी व राख नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या शेतामध्ये खड्डे खोदून त्यामध्ये विसर्जित केल्या व त्या खड्ड्यात मुलाची आठवण म्हणून फळझाडश्रचे रोपण केले. रामराजे कुटुंबाने प्रथमच गावात एक आगळीवेगळी संकल्पना राबविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

