बारा ज्योतीर्लिंगापैकी एक मानल्या गेलेल्या श्री वैद्यनाथ देवस्थान परळी या पावनभुमीत परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवींच्या परमकृपेत मराठवाडा श्री शिवपुजा व सेमिनार १४ , १५ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व सहस्त्र सहृदयी सहजयोगी साधकांना एकत्र आणणारी ही विभागीय ‘शिवपुजा व सेमिनार’ आहे. या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील साधकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. तरी हे साधकांकाठी अभिमानाचे आणि अध्यात्मिक उन्नतीचे मोठे पर्व आणि पाऊल मानले जात आहे. तरी या शिवभुमीत परमचैतन्याचा लाभ घेण्यासाठी साधकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नमामि वैद्यनाथम् पंचम ज्योतिर्लिंग हे परळीचे आराध्य दैवत असून, काशी पेक्षाही गहुभर महत्व जास्त वैद्याचा नाथ असून महाशिवरात्री यात्रेकरिता भारतभर प्रसिद्ध आहे. परळी शहरामध्ये आध्यात्मिक स्तरावर सहजयोगाचे दैवी कार्य सन १९९० साली पासून सुरु झाले. तसेच बीड जिल्ह्यामध्ये एकूण २५ सहजयोग ध्यान केंद्र सुरु आहेत..परळी वैजनाथ हे बाराही ज्योतिर्लिंगापैकी एक मानले गेलेले देवस्थान, तसेच महाशिवरात्री यात्रेसाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. अशा पवित्र क्षेत्रात श्री माताजी निर्मला देवी यांच्या असीम कृपेने ( बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, हिंगोली ) मराठवाडा स्तरावरील शिवपूजा आणि सेमिनार होणार आहे.
मराठवाडा विभागीय सामूहिक शिवपूजा प्रथमच टोकवाडीत दोन दिवसांचे अध्यात्मिक मार्गदर्शन, भजन संध्या, सामूहिक ध्यान परळीच्या पवित्र शिवभूमीत साधकांना मिळणार शिवतत्त्वाचा स्पंदनशील अनुभव सहजबालक व युवा शक्तींसाठी प्रेरक सेमिनार व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रत्नेश्वर मंगल कार्यालय, टोकवाडी, परळी वैजनाथ, जि. बीड शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी आगमन, नाश्ता व सेमिनार सत्र व त्यानंतर सांयकाळी ७ ते ९ भजन संध्या (पुणे प्रतिष्ठान म्युझीक ग्रुप राजीव बागडदे व टीम) होईल. भोजन रात्री ९ ते ११ या वेळेत राहील.
द्वितीय दिवस रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळचे ध्यान ५.३० ते ७, नाष्टा सकाळी ७ ते ९ , महापुजा सकाळी ११ वाजता आरंभ होईल.पुजा झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर साधक प्रस्थान करतील.या पुजेसाठी आणि सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रौढ एक दिवस १५, दोन दिवस २०० रूपये , तर युवा शक्तीसाठी १०० रूपये समर्पण ठेवण्यात आलेले आहे. तसेच बालशक्तीसाठी समर्पण नाही. या शिवपूजेमुळे प्रत्येक साधकाला आपल्या अंतरंगातील शिवतत्त्वाशी एकरूप होण्याची संधी मिळणार आहे.
या पुजेमध्ये सहभागी होण्यासाठी टोकवाडीचे अंतर परळी बस स्थानकापासून अंतर ५.५ किमी,परळी रेल्वे स्टेशनपासून अंतर ५ किमी आहे. तरी अधिक माहितीसाठी आणि सहभागी होण्यासाठी स्कॅनरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी परमचैतन्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.

