spot_img
7.8 C
New York
Friday, November 14, 2025

Buy now

spot_img

प्रेमात अडथळा वहिनी-दिराने संपवले भावाला

जालना : बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवारात एका युवकाचा खून करून त्याचे प्रेत प्लास्टिकच्या गोणीत भरून जवळच्याच तलावात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाल्हाच्या तलावात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत मुरघासच्या प्लास्टिकच्या गोणीत आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले असता, त्याची ओळख परमेश्वर राम तायडे (वय ३०, रा. सोमठाणा) अशी पटली.
तपासात उघड झाले की, मृताचा लहान भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे (वय २८) व पत्नी मनिषा परमेश्वर तायडे (वय २५) यांचे अनैतिक संबंध होते. मृत परमेश्वर यामुळे दोघांमध्ये अडथळा येत असल्याने, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता
कुर्हाडीने वार करून दोघांनी त्याचा खून केला. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेत गोणीत टाकून, दोरी व दगड बांधून ते गावालगतच असलेल्या तलावात फेकून दिले. मयताच्या वडिलांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कार्यवाहीत सपोनि अविनाश राठोड, पोउपनि संतोष कुकलारे, पोहेकॉ इस्माईल शेख, पोकॉ प्रीती जाधव, पोकॉ गोपाळ बारवाल, पोकॉ राम सानप यांनी सहभाग घेतला.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, व अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत परमेश्वर आणि मनिषा या दाम्पत्याला नऊ वर्षांची आणि सात वर्षांची अशा दोन लहान मुली आहेत. वडिलांचा खून आणि आईची अटक झाल्याने या दोन्ही निष्पाप बालिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ताज्या बातम्या