अहिल्यानगर : जिल्ह्यातील नेवासा येथे परमपूज्य आदिशक्ती श्री माताजींच्या परमकृपेत ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता मेगा पब्लिक प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त सहजयोगी दादा ताईंनी या प्रोग्राममध्ये सहभाग नोंदवून श्री माताजींच्या आपल्यावर सोपवलेले कार्य आपल्याला पार पाडायचे आहे. त्यामुळे पब्लिक प्रोग्राममध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे.
परम पूज्य आदिशक्ती श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या परम कृपेने सहजयोग ध्यान साधनेचा कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्काराचा भव्यदिव्य सार्वजनिक कार्यक्रम (चैतन्यमयी सोहळा) दि. ११ ऑक्टोबर २०२५ वार शनिवार रोजी सायंकाळी ०६:३० वा नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे होत आहे. या गावातील *करवीरेश्वराच्या* देवळात राहून *ज्ञानेश्वरांनी* इसवी सनाच्या तेराव्या शतकात *भावार्थदीपिका* हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. *या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो.* ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. *त्याला पैस असे म्हणले जाते*. काळाच्या ओघात करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले.पैस खांबाच्या भोवती बांधण्यात आलेल्या नव्या मंदिराचे उद्घाटन १९६३ साली झाले. या मंदिराच्या मागे भव्य असे ’ज्ञानेश्वर उद्यान’साकारण्यात आलेले आहे. याच मंदिरात आदिशक्ती परमपूज्व श्री माताजी देखील येऊन गेल्या आहेत… अशी ही अत्यंत पवित्र भूमी आहे. या पावनभूमीत हा मेगा पब्लिक प्रोग्राम ठेवण्यात आला आहे. गुरूवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. बाहेर गावावरून येणार्या सहजयोगींसाठी मोहनीराज मंगल कार्यालय (पाकशाळा) नेवासा येथे राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.
शनिवार व रविवारी सायं.४ वाजता श्री माताजींची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुले , येथे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा पार पडणार आहे. तरी सर्व सहजयोगी बंधू आणि भगिनींना आग्रहाचे आणि प्रेमाचे आवाहन सहजयोग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांक दिलेले आहेत.
९८९००६८६९०
९१३०००५९३७
९७६७८४६८६८
८४५९८६४१३६
९८८१५०८३५८
९४२१५५१५२७
९८८१३२६३८३
९७६७७७७९४६
९७६७२८२००८
७३८५२३०७४४
९८९०८१२०००
९८८१०५८०१३
९९७०५०००३९
९९२२१४३३४३
९९६०४०४७६४
७७७४००८०८१
७५७५९६५५१९
९९२२१४३३४३
९९७५४५५५१२
८६००१६४३५१
९५१८७२८७४७
८२०८५२८२१९
९८२३४५५८७५
८३२९४४७३९१