नाशिक | ज्ञानेश्वर काकड
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या अनुदानातून व श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी नाशिक च्या वतीने आयोजित ” थोर पुरुष यांची जन्म व पुण्यतिथी,” उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सफाई कामगार महिलांचा सन्मान परिचारिका व अशा वर्कर आणि शालेय विद्यार्थी निबंध तसेच वकृत्व स्पर्धा शुक्रवार दिनांक 1/ 8/ 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सातपूर येथील त्रंबक रोड लगत अयोध्या हॉटेल नवले पेट्रोल पंप शेजारी नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ सीमाताई हिरे आमदार नाशिक पश्चिम व मुख्य प्रवक्ते डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज अध्यक्ष( सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन महाराष्ट्र) व डॉ. संजय दुर्जड बिटको हॉस्पिटल नासिक यांच्याद्वारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन परिचय होणार सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रकाश भाऊ वाजे,( नाशिक लोकसभा सदस्य) मा.डॉ. देविदास नांदगावकर( सहाय्यक आयुक्त समाज कल्याण) मा. श्री सुनील जी केदार (नाशिक महानगर शहराध्यक्ष) मा. श्री गिरीशजी पालवे साहेब (माजी नाशिक महानगर शहराध्यक्ष) मा. श्री रणजीत नलावडे साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) सातपूर मा. श्री राजारामजी जाधव( विभागीय अधिकारी मनपा सातपूर )या सर्व मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजक श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी नाशिक व पदाधिकारी अध्यक्ष मा. अरुणाताई दरगुडे सचिव मा. श्री रंगनाथ दरगुडे उपाध्यक्ष मा. श्रीमती अनिताताई नागरे उपाध्यक्ष मा. सौ शिल्पाताई झारेकर मॅडम कोषाध्यक्ष मा. श्री डॉक्टर संकेत नागरे व सूत्रसंचालन मा. श्री बी के नागरे सर हे करणार व माननीय श्री बाळासाहेब घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन संपन्न होणार आहे. तरी परिसरातील सर्व बंधू-भगिनी व विद्यार्थी आणि मित्र मंडळ यांनी कार्यक्रमात सहभागून उपस्थित राहावे असे संस्थेच्या वतीने आव्हान करण्यात आले.