spot_img
24.1 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

आरडगाव येथे कुंडलिनी जागृती आत्मसाक्षात्कार सोहळा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील निर्मलधाम आश्रम आरडगाव या ठिकाणी परमपूज्य आदिशक्ती माताजी श्री निर्मलादेवी यांच्या आशीर्वादाने रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व साधकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन परमपूज्य श्री माताजींनी आपल्याला दिलेले कार्य आपण परमचैतन्याच्या माध्यमातून पार पाडूया असे आवाहन सहजयोग प्रचार-प्रसार टिम,महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील परअमपूज्य श्री माताजींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या भूमित श्री माताजींच्या कृपेने प्रचार प्रसार करण्याचा योग आला आहे . १८ जुलैपासून या ठिकाणी प्रचार प्रसाराला सुरूवात होणार आहे . शहरात विविध ठिकाणी सहजयोगा संदर्भात माहिती देणे, पोस्टर वाटणे आदी कार्य करण्यात येणार आहे. त्यानंतर संंध्याकाळी ७ ते १० या वेळेत भजनं संध्या आयोजित करण्यात आली आहे . तर रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी आरडगाव ता.राहुरी जि.अहिल्यानगर या ठिकाणी कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार प्रोग्राम होणार आहे. बाहेर गावावरून येणार्या साधकांसाठी निर्मलधाम आश्रम,आरडगाव या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे . तरी सर्व साधकांनी प्रचार प्रसारात सहभागी होऊन परमचैतन्याचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग प्रचार-प्रसार टिम,महाराष्ट्र यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी
९१३०००५९३७,९९२२१४३३४३
९८८१०५८०१३ ९४२३७३५७५४
वरील क्रमांकावर संपर्क करू शकता.

ताज्या बातम्या