spot_img
24.6 C
New York
Thursday, July 3, 2025

Buy now

spot_img

स्मार्टपूर प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना गावातल्या गावात सेवा उपलब्ध

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
ऋचा व नोकिया कंपनी मार्फत आपल्या नाशिक जिल्ह्यातील २० गावांमध्ये नोकिया स्मार्टपूर व्हिलेज नावाचा प्रकल्प सुरू आहे.यात सिन्नर तालुक्यातील चार इगतपुरी तालुक्यातील बारा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. त्यामध्ये शासकीय योजना ,वित्तीय सेवा, डिजिटल शिक्षण, उपजीविका हे स्तंभ आहे. या स्मार्टपूर व्हिलेज प्रकल्प अंतर्गत स्मार्टपूर सेंटरद्वारे शासकीय योजना या घटका अंतर्गत अनेक प्रकारच्या सेवा गावातील लाभार्थ्यांना मिळवुन दिल्या जात असून या २० स्मार्टपुर सेंटर अंतर्गत लाभार्थ्यांना अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ मिळत आहे.
त्यातील शासकीय योजना या घटकांतर्गत गावातील लाभार्थ्यांना नवीन आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्ड अपडेट करणे तसेच इतर शासकीय दाखल्यांबाबत गावामध्ये कॅम्प लावून लाभार्थ्यांना गावातल्या गावात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.जून महिन्यात एकूण ७ गावांमध्ये आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये एकूण ३९० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच ९ गावांत शासकीय योजना कॅम्पचे आयोजन करण्यात आले यामध्ये ४७२ लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या शासकीय योजनांचे फॉर्म भरून लाभ घेतला . या सर्व कामकाजाचा फायदा नागरिकांना, मुलांच्या शाळेच्या प्रवेशसाठी, मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, रेशन केवायसी करने, घरकुल योजनेचा लाभ घेणे, उद्यम आधार काढणे, नॉन क्रिमिनिअल दाखला काढणे ,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ,नवीन पॅन कार्ड काढणे, शॉप क्ट लायसन्स काढणे, आयुष्यमान कार्ड काढणे ,पोलीस वेरिफिकेशन करणे ,महाडीबीटी योजनेचा लाभ घेणे, बँक अकाउंट उघडणे, फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करणे, नवीन पॅन कार्ड काढणे , आभाकार्ड, आयुष्यमान , ई – श्रम कार्ड काढणे ,हरवलेला आधार कार्ड काढणे, बँकेसाठी ,रेशन केवायसी करणे , लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय अनुदानचा लाभ मिळणे या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड काढणे व अपडेट करणे खूप गरजेचे होते.
प्रामुख्याने या कामकाजाकडे स्मार्टपूर प्रकल्प व्यवस्थापक हरिष वैद्य ,सुकेश केंद्रे व सागर ढगे यांनी प्रामुख्याने लक्ष घालून कॅम्प चे आयोजनाचा कामकाज पूर्ण करून घेतले. या कामकाजाचा नागरिकांना खूप फायदा होत आहे. या कॅम्पची माहिती नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम प्रोजेक्ट समन्वयक व सेंटर चालक यांनी केले. त्यामुळे सर्व नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली व त्यांनी त्याचा लाभ घेतला.

ताज्या बातम्या