spot_img
17.9 C
New York
Friday, August 1, 2025

Buy now

spot_img

निर्मलधाम आश्रम आरडगावमध्ये सहजकृषी सेमिनार

अहिल्यानगर : परमपूज्य श्री माताजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या निर्मलधाम आश्रम आरडगाव या ठिकाणी २२ जून २०२५ रोजी एक दिवसीय सहज कृषी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे . श्री माताजींनी सहज पद्धतीने शेती कशी करावी या विषयी सर्व जगाला संदेश दिला. त्या संदेशाव्दारे आज भरपूर सहजयोगी शेती करत आहेत. त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे सहज कृषीव्दारे शेती कशी करावी या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी सहज कृषी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे .
श्री माताजींनी २४ फेब्रुवारी १९७९ मध्ये राहुरी या ठिकाणी सेमिनार घेतले होते. त्यामध्ये दुसर्‍या दिवशी श्री माताजींनी सांगितले की , महाराष्ट्र हा देश म्हणजे विशेष आहे. त्यात तुमचे राहुरी म्हणजे त्यांचे हृदय आहे. त्यात इथले विद्यापीठ, जिथे तिथले शेतकरी येऊन शिकतात, हे सर्व महाराष्ट्रात जाऊन आज इथले लेणे घेऊन जाणार आहेत. जे पावित्र्याचे लेणे आहे, ते प्रत्येक खेडेगावातून आणि प्रत्येक शहरातून आज नेण्याची तुमची फार मोठी जबाबदारी आहे.
परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी विश्वाला दिलेले वरदान सहज कृषि ज्या पुण्य भूमितून सुरु झाली अशा पावन भूमी आणि श्री माताजींद्वारे स्थापित विश्वातील पहिला सहजयोग आश्रम निर्मला धाम, आरडगांव-राहुरी अहिल्यानगर येथे एक दिवसीय सहज कृषी सेमिनारचे आयोजन रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता केले आहे. सर्व सहज योगी बंधू भगिनींनी या सेमिनारमध्ये सहभागी होऊन सहज कृषी विषयाचे श्री माताजींनी सांगितले तत्व व श्री आदिशक्तींचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत असे आवाहन व्यवस्थापक व कार्यकारिणी सभासद द लाईफ इटर्नल ट्रस्ट, मुंबई द्वारा संचलित,निर्मला धाम आश्रम, आरडगाव-राहुरी, जि.अहिल्यानगर, महाराष्ट्र यांनी केले आहे . सेमिनार फी-१०० रूपये ठेवण्यात आली असून अधिक माहितीसाठी ८८७१५१९१९१ , ९४२३७८५७५४, ९५११३७१११७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकेशन : https://maps.app.goo.gl/fkRbZwawat5YMjwh6

ताज्या बातम्या