spot_img
18.8 C
New York
Saturday, August 2, 2025

Buy now

spot_img

चिंचोटी जि.प.शाळेत प्रवेशोत्सव

वडवणी : तालुक्यातील चिंचोटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उत्साहात प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात अतिरिक्त गटविकास अधिकारी श्री. पोहनेरकर साहेब, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सुशेन मायकर,सरपंच श्री. भागवत गोंडे, गोविंद गोंडे, साहेबराव गोंडे, दिनकर गोंडे, बालनाथ गोंडे, जावळे, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. सकाळी नवागताचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले त्यानंतर बैल गाडीत पहिल्या वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना बसवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थी यांना शालेय गणवेश, पाठयपुस्तक, बूट ,पायमोजे, गोड भात, बिस्कीट देण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे, सरपंच, अध्यक्ष व शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या हस्ते एक पेड मॉं के नाम या प्रमाणे झाडे लावण्यात आली. त्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पांडुरंग गोंडे , मु.अ. नांदेसर, राऊत सर,बापू धन्वे सर,भोज, घोळवे, देवकते, इंगळे गडदे सर यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

ताज्या बातम्या