spot_img
28.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

spot_img

राज ठाकरे भावासोबत की देवासोबत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरु आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असताना दोघेही एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. अशातच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच वेळी वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांच्या मनसे प्रमुखांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. अशातच राज ठाकरे वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री फडणवीसही काही वेळापूर्वी याच हॉटेलमध्ये पोहोचले होते. ही राजकीय भेट आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र दोघांमध्ये गेल्या ३० मिनिटांपासून बैठक सुरु असल्याचे वृत्त माध्यमांनी दिलं आहे.

ताज्या बातम्या