spot_img
13.3 C
New York
Saturday, April 11, 2026

Buy now

spot_img

अरूणाताई तरगुडे यांना समाजरत्न पुरस्कार

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष सौ अरुणाताई तरगुडे यांना समाज रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आलं.
नाशिकच्या सत्य मार्ग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने सौ अरुणाताई दरगुडे संस्थापक अध्यक्ष श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी नाशिक यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सत्य मार्ग फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष सौ शिल्पा झरे कर्म मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सौ अरुणा ताई दिव्यांगांच्या व वयोवृद्धांच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक आणि तळमळीने कार्य करत असतात त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना शालेय शिक्षण वाटप दिव्यांगांना साहित्य वाटप दिवाळीला फराळ हिवाळ्यामध्ये ब्लँकेट तसेच वय वृद्धांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांच्या उतरत्या वयामध्ये मनप्रसन्नसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे बालगोपाल यांच्या विविध कलाकृती कलाकृत्य नृत्य गायन मदनी खेळ बालसंस्कार केंद्र यासारखे उपक्रम संस्थेद्वारे राबवली जातात आणि म्हणूनच आपण त्यांना आज महाराष्ट्र समाज रत्न भाषण पुरस्कार आणि सन्मानित करण्यात येत आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करते की या संस्थेच्या माध्यमातून असं अरुणाताई दरगुडे यांच्या हातून असेच मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात व देशात कार्य घडो ही बशेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना.

ताज्या बातम्या